esakal | पत्नीला मंगळ नसणे हे घटस्फोटाचे कारण नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

High court denied divorce case of husband over astrological reason

पत्नीला मंगळ नसण्याची बाब लग्नानंतर पुढे आल्याने पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळल्यानंतर पतीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

पत्नीला मंगळ नसणे हे घटस्फोटाचे कारण नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : पत्नीला मंगळ नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये घटस्फोटासाठी धाव घेणाऱ्या पतीची याचिका फेटाळली. याचिकाकर्त्या पतीला मंगळ असल्याने त्याला पत्नीसुद्धा मंगळ असलेलीच पाहिजे होती. मात्र, पत्नीला मंगळ नसण्याची बाब लग्नानंतर पुढे आल्याने पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळल्यानंतर पतीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

याचिकेनुसार, अभिषेक आणि साक्षी (बदललेले नाव) यांचे लग्न ८ मे २००७ रोजी झाले. त्यांना एक मुलगीही आहे. लग्नानंतर अभिषेकला सरकारी नोकरीही मिळाली. अभिषेकचा दावा आहे की, त्याच्या जन्म पत्रिकेनुसार त्याला मंगळ आहे. अशा परिस्थितीत तो लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी शोधत होता. 

छत्तीसगडमधील मोठ्या अधिकाऱ्याची नागपूरमधील लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या

साक्षी दूरच्या नात्यात होती. त्यावेळी तीला मंगळ असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे, राहुलच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न ठरविले. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर साक्षीचे शैक्षणिक कागदपत्रे अभिषेकने पाहिले. त्यामध्ये, साक्षीने चुकीची जन्मतारीख दिल्याचे दिसून आले. वास्तविक तीला मंगळ नव्हते. हे रहस्य समोर आल्यानंतर तिने पतीचे घर सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला.

या कारणास्तव, पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयामध्ये साक्षीने सर्व आरोप फेटाळून लावले. लग्नाच्या वेळी पत्रिकेची देवाणघेवाण झाली नाही. तसेच, तीला मंगळ नसल्याची बाब देखील लपवून ठेवण्यात आली नाही. उलट लग्नानंतर सांक्षीला शैक्षणिक कागदपत्रे दाखविण्यासाठी भाग पाडले गेले. त्यासाठी तीला मारपीठ केल्या जात होती आणि जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली जात होती. 

या कारणास्तव, तिने पतीचे घर सोडले आणि माहेरी परत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पतीद्वारे दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आणि कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. या प्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.

जंगलात जनावरे चराईसाठी गेला आणि समोरचे दृष्य पाहून सरकली पायाखालची जमीन

ज्योतिषी अंदाज लावू शकत नाही

न्यायालयाने अभिषेकला ‘मंगळ’ असणे म्हणजे काय? असा प्रश्‍न विचारला असता त्याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. आपल्या जीवनातील निर्णय तो पत्रिकेच्या आधारे घेत नाही, असेही त्याने न्यायालयामध्ये मान्य केले. तसेच, कुठलाही ज्योतिषी लग्न टिकेल की नाही, याचा अंदाज लावू शकत नाही, हे सुद्धा मान्य केले. लग्नाआधी त्याने मुलीच्या पार्श्वभूमीच सखोल चौकशी केली होती. त्याला ती मुलगी आवडली होती. म्हणूनच तो लग्नासाठी तयार होता. सर्व पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पत्नीला मंगळ नसल्यामुळे दोघांच्याही जीवनावर विपरीत परिणाम झाला, याचा कुठलाही पुरावा नाही. उलट लग्नानंतर पतीला सरकारी नोकरी मिळाली. एक मुलगी झाली, वैवाहिक जीवनसुद्धा काही काळ आनंदी होते. त्यामुळे, पत्नीने जन्म तारीख लपविणे, ही क्रूरता ठरु शकत नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ