जंगलात जनावरे चराईसाठी गेला आणि समोरचे दृष्य पाहून सरकली पायाखालची जमीन

संतोष ताकपिरे
Thursday, 4 March 2021

मागील काही दिवसांपासून आयुक्तालयाच्या हद्दीत या वयाचा कुणीही पुरुष बेपत्ता नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटावी म्हणून घटनास्थळी आसपासच्या गावातील काही ग्रामस्थांना बोलविण्यात आले होते.

अमरावती : चांगापूर ते वलगाव मार्गावर जंगलात एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. बुधवारी (ता. तीन) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह अंदाजे ३१ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा असून, उंची अंदाजे सहा फूट आहे. हत्या की, आत्महत्या यासंदर्भात संभ्रम कायम आहे. ही घटना चोवीस तासांपूर्वीची असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. मंगळवारी (ता. दोन) रात्री ही घटना घडली असावी.

तीन तारखेला सकाळी परिसरात जनावरे चराईसाठी जाणाऱ्या व्यक्तीला जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसला. जंगलात ज्याठिकाणी मृतदेह आढळला त्याच्या आसपासचे बरेच चौरस फूट जंगलालासुद्धा आग लागून बरेच नुकसान झाल्याचे दिसून आले. एकतर दुसरीकडे मारहाण करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वलगाव ते चांगापूर मार्गावरील जंगलात जाळला असावा.

अधिक माहितीसाठी - ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

गाडगेनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली. मागील काही दिवसांपासून आयुक्तालयाच्या हद्दीत या वयाचा कुणीही पुरुष बेपत्ता नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटावी म्हणून घटनास्थळी आसपासच्या गावातील काही ग्रामस्थांना बोलविण्यात आले होते. परंतु त्यातही ठोस निष्कर्ष निघू शकला नाही.

निर्जनस्थळी दारूच्या बॉटल्स
जेथे जळालेला मृतदेह आढळला. त्याच्या आसपासचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. निर्जनस्थळी दारूच्या खाली बॉटल्स आढळल्या. 
- आसाराम चोरमले,
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

जाणून घ्या - पतीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

शवविच्छेदनातून बऱ्याच बाबी स्पष्ट होतील
सदर व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. शवविच्छेदन अहवालातून बऱ्याच बाबी स्पष्ट होतील.
- पूजा खांडेकर,
सहायक पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A burnt body was found in the forest of Amravati