

Ongoing construction work on the Nagpur–Katol highway amid delays that drew sharp remarks from the High Court.
Sakal
नागपूर : अधिकाऱ्याने किमान आपल्या पद आणि जबाबदारीप्रती निष्ठावान असायला हवे. जनतेच्या पैशांतून वेतन घेत असताना जनतेच्या हितांची उपेक्षा करून ठेकेदारांच्या हिताचे काम करणे हा गंभीर प्रकार आहे. ही बाब कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यासारखी नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांना मंगळवारी फटकारले.