High Court: सिमेंट रस्त्यांचे काम थांबवण्याचे आदेश देऊ शकत नाही; उच्च न्यायालय, याचिकाकर्त्याला समतल रस्त्यावर मागविली माहिती
Nagpur News: नागपूरमध्ये सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांचे काम थांबविण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. फ्लाय ॲश मिश्रण व आरोग्य धोक्यांबाबत याचिकाकर्त्याने मांडलेले मुद्दे तपासले जाणार आहेत.
नागपूर : शहरामध्ये जोमाने सिमेंटीकरण सुरू आहे. परंतु, योग्य कारण मिळेपर्यंत आम्ही सिमेंट रस्त्यांचे काम थांबविण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे मत (मौखिक) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले.