

Divorce Case High Court Rules Ordinary Marital Disputes Cannot Be Treated as Cruelty Dismisses Husband Appeal for Divorce
sakal
नागपूर : पत्नीशी होणारे वारंवार किरकोळ वाद, स्वभावातील मतभेद किंवा प्रदीर्घ काळ विभक्त राहणे एवढ्याच कारणांवरून वैवाहिक क्रूरता अथवा परित्याग सिद्ध होत नाही. तसेच वैवाहिक नाते संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे, हा घटस्फोटाचा स्वतंत्र कायदेशीर आधार ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. पत्नीविरुद्ध क्रूरता आणि परित्यागाचे आरोप करत घटस्फोट मागणाऱ्या नागपुरातील पतीची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा घटस्फोट नाकारणारा मूळ निकाल कायम ठेवला आहे.