

Judiciary Pulls Up State Govt Over Neglect of Marathi Education
Sakal
Marathi Medium Schools Crisis : राज्यात सातत्याने बंद पडत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले. मराठी शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळा बंद कराव्या लागत असल्याचा अजब युक्तिवाद शासनातर्फे करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात मराठी शाळाच अस्तित्वात राहिल्या नाहीत, तर अभिजात मराठी भाषेचा दर्जा कसा टिकून राहणार, असा प्रश्न (मौखिक) उच्च न्यायालयाने उपस्थित केला.