Samruddhi Highway : समृद्धीवर सुविधा द्या, अन्यथा दहा लाखांचा दंड; उच्च न्यायालयाची अधिकाऱ्यांना तंबी
Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृहांच्या गडबडीनंतर तेल कंपन्यांना फटकारले. स्वच्छतेची परिस्थिती सुधारली नाही तर अधिकाऱ्यांच्या पगारातून दहा लाख रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नागपूर : समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य आहे. पेट्रोल पंप संचालक कंपन्या केवळ व्यवसायाचा विचार करतात, त्यांना जनसुविधेबाबत काळजी नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तिन्ही तेल कंपन्यांना फटकारले.