esakal | हिंगणा : दोन बुथ मतदारयादीतून गहाळ; मतदान केंद्र उभारलेच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

election

हिंगणा : दोन बुथ मतदारयादीतून गहाळ; मतदान केंद्र उभारलेच नाही

sakal_logo
By
अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : तालुक्यातील डिगडोह-ईसासनी या जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमध्ये आज मतदानाच्या दिवशी निवडणुकीत असलेले २ यादीतील भाग जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात समावीष्ट न झाल्याने ३ बुथ गहाळ झाले. मागील निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांना या पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क न मिळाल्याने संतप्त झाले. काही काळ भीमनगर येथील मतदानकेंद्रासमोर या मतदारांनी संताप व्यक्त केला. सर्व राजकिय पक्षाचे उमेदवार पोहचले. त्यांनी या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. मतदान केंद्रासमोरील तणाव लक्षात घेता पोलिस दलाला बोलविण्यात आले होते.

मागील २०२१ ला पार पडलेल्या निवडणुकीत जेवढ्या मतदार यादी होत्या, तितक्याच मतदारयादी भागमध्ये मतदान होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु यावर्षी एप्रिल महिन्यात या मतदारयद्यांची पुनर्रचना होऊन नवीन मतदारयाद्या तयार झाल्या. त्यात दोन यादी भाग सुटले. प्रारूप मतदारयादी व अंतीम मतदारयादी तहसील कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आल्या. त्यावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप आले नाहीत. त्यामुळे याच नवीन मतदारयाद्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरु झाली.

या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर पुन्हा मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या. तरीही कोणाचाही आक्षेप आला नाही. आज मात्र या भागातील मतदानासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना कोणत्याही मतदान केंद्रावर नाव सापडले नाही. काही उमेदवारांच्या लक्षात हा प्रकार आला की यादी भाग क्र. २८२ व २८३ दोन याद्यातील सुमारे दीड हजार मतदारांची नावे सुटली.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

त्यामुळे मतदारांनी भीमनगर येथील मतदानकेंद्रासमोरच गर्दी करून विरोध दर्शविल्याने तणावाचे वातावरण होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बसपा, वंचित बहुजन आघाडी या निवडणूक लढवित असलेल्या प्रमुख पक्षांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार हिंगणा यांना निवेदन देऊन या मतदारसंघात निवडणूक स्थगित करून सुटलेला यादी भाग असलेल्या क्षेत्रात पुन्हा मतदान घ्यावे, अशी मागणी केली. याशिवाय ऑनलाइन मतदार यादीत असलेले शाळेतील बुथ इतरत्र हलविण्यात आल्याने सुद्धा मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

मागील यादीनुसार दोन यादीभाग कमी झाले

मागील एप्रिल महिन्यात मतदारयद्यांचे पुनर्निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी कोरोनामुळे परिस्थिती अतिशय वाईट होती. तहसील कार्यालयात देखील कर्मचारी या विळख्यात सापडले होते. गावागावात सुद्धा रुग्णसंख्या जास्त होती. या परिस्थितीत मतदारयाद्या तयार करून प्रारूप याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. त्यानंतर सुद्धा अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्या. अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा मतदारयाद्या प्रकाशित करण्यात आल्या, परंतु एकही वेळ उमेदवार किंवा कुणाकडूनही आक्षेप आला नाही. त्यामुळे त्या याद्यानुसार मतदान केंद्र तयार करण्यात आले. मागील यादीनुसार दोन यादीभाग कमी झाले, असे तहसीलदार खांडरे यांनी सांगितले.

"ईसासनी- डिगडोह क्षेतील दोन बुथ लावण्यात आले नाही. मतदार यादीतील समारंभामुळे ही स्थिती निर्माण झाली. मतदारांमध्ये यामुळे गोंधळ उडाला. प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग याबाबत घेणार आहे."

- इंदिरा चौधरी, निवडणूक निर्णय अधिकारी, हिंगणा

loading image
go to top