

Women Power on Display: Laxmi Sonbawane Shines in Shankarpat
Sakal
धामणगावरेल्वे : आधुनिक भारताची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, याचा प्रत्यय तळेगाव येथील पटामध्ये दृष्टिपथास आला. हा पट महिलांसाठी आरक्षित होता. या दिवशी बैलजोड्या आणणे, त्या लावणे, जोडी सोडणे आदी कामे महिलांनीच केली. इतकेच काय तर धुरकरीसुध्दा महिलाच होत्या. दरम्यान, महिला शंकरपटात लक्ष्मी सोनबावणेने सुंदर-राघव या बैलजोडीच्या मदतीने इतिहास रचत प्रथम क्रमांक पटकावला.