esakal | कोरोनाकाळात जोपासला हिरवाईचा छंद; फुलझाडे, औषधी वनस्पतींची केली लागवड
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाकाळात जोपासला हिरवाईचा छंद; फुलझाडे, औषधी वनस्पतींची लागवड

कोरोनाकाळात जोपासला हिरवाईचा छंद; फुलझाडे, औषधी वनस्पतींची लागवड

sakal_logo
By
मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर) : कोरोनामुळे (coronavirus) महिलांना घरी बराच वेळ मिळतो. त्यामुळे कुणी हिरवाईचा छंद जोपासला आहे. तर कुणी घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी रोपट्यांची लागवड (Planting of seedlings) करून संगोपन करीत आहेत. सावनेर येथील हिना नारेकर व चांदणी नारेकर या महाविद्यालयीन तरुणींनी कोरोनाकाळात गुळवेल, तुळस, कोरफड, मनीप्लांट, जास्वंद आदी रोपट्यांना महत्त्व दिले आहे. याशिवाय इतर शोभिवंत रोपट्यांची लागवड करून छोटाशा जागेत आकर्षक इनडोअर प्लांट (Indoor plant) तयार केला. हिरवाईशी मैत्री करीत रोपट्यांच्या संगोपनात वेळ घालवत असल्याचे सांगतात. (Hobby of planting trees in Jopas during the Corona period)

कोरोनामुळे आरोग्याबद्दल जागरूकता वाढली आहे. गुळवेल, तुळस या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही. कोरोनामुळे ही संधी मिळाली आहे. वेळेचा सदुपयोग, मन प्रसन्न व्हावे, घराचे सौंदर्य वाढावे यासाठी कुठे परसबाग लावली जात आहे तर कुठे वेगवेगळ्या रोपट्यांचा वापर करून छोटासा प्लांट तयार करण्यात येत आहे.

हेही वाचा: वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

छोट्याशा जागेत, गच्चीवर किंवा गॅलरीत आकर्षक बाग फुलविता येते. यासाठी इच्छाशक्ती व थोडाफार वेळ काढण्याची गरज असत. आता घरीच राहून गृहिणी व विशेष करून तरुणाई मातीच्या कुंड्या, मातीची भांडी, टप आदींमध्ये रोपट्यांची लागवड करीत आहे. कोरोनाकाळात फुलझाडे व औषधी वनस्पतींची लागवड केल्याचे वैशाली निकाजू, पूनम कोहळे, रेशमा हिवसे, शिल्पा बसवार, प्रीती डोईफोडे, सोनाली उमाटे, मीना खापर्डे, सपना कामोने, स्नेहल नागरे, सुनीता जुनघरे सांगतात.

कोरोनामुळे घरीच राहण्याची वेळ आल्याने घरकाम व उरलेल्या वेळात छोटासा इनडोअर प्लांट तयार करण्याचे आम्ही नियोजन केले. यामुळे घराच्या सौंदर्यीत भर पडली. शिवाय मनाला आगळावेगळा आनंद वाटतो.
- चांदणी, हिना नारेकर, सावनेर

(Hobby of planting trees in Jopas during the Corona period)