Video : अनिल देशमुख खऱ्या अर्थाने झाले "होम मिनिस्टर", घेतला स्वयंपाकघराचा ताबा

anil deshmukh
anil deshmukh

नागपूर : रविवारी देशभरात "जनता कर्फ्यू' घोषित करण्यात आला होता. मूळचे नागपूरकर असलेल्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील हा दिवस कुटुंबियांसोबत घालविणे पसंत केले. गृहमंत्री अनिल देशमुख पूर्ण वेळ घरीच होते. घरीच बसून त्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. यातून थोडा वेळ काढून त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घेत कुटुंबियांना आश्‍चर्याचा धक्का दिला. 

कुटुंबियांना दिला आश्‍चर्याचा धक्का 
साहेब किचनमध्ये आल्याचे बघून पत्नी आरती आणि मुलगी डॉ. पायल आणि सून आश्‍चर्यचकीत झाले. त्यांच्यातला शेफ लगेच जागा झाला व त्यांनी किचनचा ताबा घेतला आणि भाजी बनवली. यामुळे कुटुंबियांना त्यांच्यातील शेफचे दर्शन झाले. सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला आणि गप्पांमध्ये रंगले. जेवण झाल्यावर श्री देशमुख यांनी पुन्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधत राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काल वर्धा मार्गावरील निवासस्थानी होते. दिवसभर कुटुंबियांसोबत घालवल्यानंतर सायंकाळी 5 वाजता सर्वांनी घराबाहेत येऊन टाळ्या वाजवल्या व थाळीनाद केला.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काल वर्क फ्रॉम होम करीत वॉर्डरोबची स्वच्छता करण्यासोबत गार्डनिंगही केले. ऊर्जा व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घरुनच कामकाज केले. पत्नी, मुले आणि नातवंडांसोबत वेळ घालवून दुपारी वाचन केले. त्यानंतर काही वेळ त्यांनी सिनेमाचा आनंद घेतला. कालच्या "जनता कर्फ्यूला' जनतेसह लोकप्रतिनीधींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

खासगी डॉक्‍टरांनीही उतरावे कोरोनाच्या लढ्यात 
संपूर्ण जग कोरोना या गंभीर आजाराशी लढत आहे. महाराष्ट्रावरदेखील या व्हायरसचे सावट आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. सरकारी दवाखान्यातील सर्व डॉक्‍टर्स व कर्मचारी जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या सेवेत आहे. खासगी डॉक्‍टरांनीही पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणेला मदत करावी, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले.

नागपुरचा हा कुख्यात गुंड अखेर जेरबंद, गोळीबारासह 23 गुन्हे आहेत दाखल 

प्रत्येकाने माणुसकीचा परीचय देत या आजारावर मात करण्यासाठी शक्‍य ती मदत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावी. बाहेरून येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. तरीही कुठेही संशयित आढळल्यास लोकांनी स्वतः जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांनी संपर्क करावा आणि या लढ्यात आपलेही योगदान द्यावे, असेही आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com