Nagpur Crime: लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात; गिट्टीखदान पोलिसांकडून अटक, डझनभर लोकांना अडकवून केली लूट
Fake Marriage: फेसबुक, विवाहाचे आमिष आणि खोटे आरोप यांचा वापर करून अनेक पुरुषांना फसवणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ला अखेर नागपूर पोलिसांनी अटक केली. वर्षभरापासून फरार असलेली समीरा फातिमा ऊर्फ सीमा ही सिव्हिल लाईन्समध्ये सापळा रचून पकडण्यात आली.
नागपूर : अनेकांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून लग्न करून ब्लॅकमेल करणाऱ्या लुटेरी दुल्हनला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. सुमारे एका वर्षापूर्वी, गुलाम गौस पठाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी समरला ऊर्फ समीरा फातिमा ऊर्फ सीमाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.