

Police personnel at the crime scene in Nagpur after a shocking double murder incident.
sakal
मेहकर: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने आपल्या पत्नीसह अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केली. ही घटना साेमवारी (ता. २९ डिसेंबर) रोजी पहाटे मेहकर शहरातील शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात घडली. रूपाली राहुल म्हस्के (वय २८) आणि चार वर्षांचा मुलगा रेहांश राहुल म्हस्के असे मृत मायलेकाचे नाव असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.