esakal | आधी पैसे नंतर मृतदेह! खासगीत रुग्णांच्या कुटुंबियांचे होताहेत प्रचंड हाल 
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital denies to give mortal remains of corona patient demanding money

मृत्यूपश्चात उरलेल्या १ लाख २४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह अंतीम संस्कारासाठी रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला.

आधी पैसे नंतर मृतदेह! खासगीत रुग्णांच्या कुटुंबियांचे होताहेत प्रचंड हाल 

sakal_logo
By
सतीश घारड

टेकाडी (जि.नागपूर) : पारशिवनी तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. परवा तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील बिल २ लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके निघाले.

मृत्यूपश्चात उरलेल्या १ लाख २४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह अंतीम संस्कारासाठी रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला. सोमवारी ९१ बाधित रुग्णांसह एक बाधित मृताची भर पडल्याने तालुक्यात आता समूहसंसर्ग झाला की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शेवटी या प्रकारामुळे पीडित कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

ग्रामपंचायत टेकाडी अंतर्गत ६५ वर्षीय व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी दगावली. २९ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये तो बाधित आला होता. तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. 

गेल्या काही दिवसात सहावे शतक पूर्ण करून ६४५ रुग्णांची भर पडली आहे. तपासण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी रुग्णांच्या संख्येत होणारी त्यातही कुटुंबातच होणारी लागण हा काळजीचा विषय ठरत आहे. कांद्री कोविड केंद्रात सोमवारी केलेल्या ६८ चाचण्यांमध्ये २२ बाधित रुग्ण तर पारशिवनी येथे ६८ रुग्ण तर एक आर्टिपीसीआरमध्ये शनिवारला बाधित आले होते. एकूण तालुका ६४५, तर १३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयात सोसावा लागतो त्रास

प्रशासनाच्या वतीने कमी लक्षणे असलेल्या व नसलेल्यांसाठी घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत असले तरी चिंताजनक रुग्णांना व्हेंटीलेटरसाठी मात्र अजूनही पळापळ करावी लागत आहे. विनामास्क फिरणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सारख्या बाबींमुळे पटकन लोकांना संसर्ग होतो आहे.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील बिलाचा भार आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय यात कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत अनेक पिडीत कुटुबीयांनी व्यक्त केले. टेकाडी येथील मृत व्यक्तीचे कामठी खासगी रुग्णालयातील बिल २लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके झाले होते. मृत्यूपश्चात उरलेल्या १लाख२४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image