esakal | हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भटकंती, प्लेसमेंटचा आकडा अडीच हजाराहून पोहोचला ९९ वर
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel-management

हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भटकंती, प्लेसमेंटचा आकडा अडीच हजाराहून ९९ वर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : गेल्या वर्षभरापासून देशासह जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पर्यटन जवळपास बंद असून हॉटेल व्यावसायिकांवर त्याच्या मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 'हॉटेल मॅनेजमेंट' विषयात पदवी मिळविली, त्या विद्यार्थ्यांना नोकरीच मिळत नसल्याने नैराश्य आले असल्याचे दिसून येत आहे.

देशात गेल्या वर्षीपर्यंत हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस असल्याने त्यामध्ये करिअर करण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याचे दिसून आले. ही संख्या मात्र, मागील वर्षी देशासह विदेशात कोरोना विषाणूने थैमान घातले. यामुळे राज्य,देश आणि संपूर्ण जगातील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली. राज्या-राज्यासह विदेशातील सीमा सील करण्यात आल्यात. त्यामुळे परिणामाने हॉटेल व्यवसायावर मंदी आली. टाळेबंदीने त्यात भर घातली. यामुळे गेल्यावर्षी हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला. परिणामी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. याशिवाय नव्या नोकऱ्यांची भरती बंद झाली. तेव्हा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची कुठलीच संधी उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. सध्याही देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे राज्यात टाळेबंदी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. याप्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य पसरले असून नोकरी मिळणार नसल्याने ते हताश झाले आहेत.

हेही वाचा - 'मेडिकल'च्या किचनमधील कर्मचाऱ्याचाच कोरोनानं मृत्यू

गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसावे लागत आहे. विशेष म्हणजे ज्यांना कामे मिळाली, त्यांना पाच ते आठ हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे इतका महागडा अभ्यासक्रम करुनही ना नोकरी ना पगार अशी अवस्था विद्यार्थ्यांची झालेली आहे.
-मनिष कुबडे, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन

वर्ष विद्यार्थी प्लेसमेंट

  • २०१७-१८ ५,३६४ २,५६१

  • २०१८-१९ ५,००४ २,७९९

  • २०१९-२० ४,८३१ २,५३९

  • २०२०-२१ ४,८३१ ९९