Tragic Incident at Hotel Royal Villa on Wardha Road
Sakal
नागपूर : पत्नीने आत्महत्या केल्याने गुन्हा दाखल होऊन सासऱ्याकडील नातेवाईक धमकावीत असल्याने पतीने गळफास घेत आत्महत्या केली. याशिवाय त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावर असलेल्या ‘हॉटेल रॉयल विला’ येथे उघडकीस आली.