शेतकऱ्यांनो! आता अनुदानावर मिळणार बियाणे, असा करा अर्ज

seeds
seedse sakal
Updated on

जलालखेडा (जि. नागपूर) : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये (maha-DBT portal) आता बियाण्यांचादेखील (seeds) समावेश केला आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज (online application) करावा, असे आवाहन नरखेड तालुका कृषी विभागाने केले आहे. (how to apply for seeds in maha dbt portal)

seeds
भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

‘अर्ज एक शेतकरी अनेक’ या हेतूने महाडीबीटीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विविध योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यात आता बियाणे घटकाचाही समावेश करण्यात आल्याने सोयाबीन, धान, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी बियाणे अनुदानावर मिळू शकतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ही सुविधा मिळणार आहे, असे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल, लॅपटॉप किंवा गावातील सामुदायिक सेवा केंद्र अथवा ग्रामपंचायतीच्या संग्राम केंद्राची मदत घेता येईल. त्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना, असा पर्याय आधी निवडावा लागेल. पोर्टलवर विविध माहिती भरल्यानंतर अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी दोन हेक्टरपर्यंत एका शेतकऱ्याला लाभ मिळू शकेल.

seeds
तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

शेतकऱ्यांना यासंदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer at gmail.com या मेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक आधी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.

असे मिळणार अनुदान

गळीतधान्य विकास योजनेतून सोयाबीनसाठी बियाण्याच्या किमतीच्या ५० टक्के किंवा १२०० रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तीळ बियाण्यावर मात्र अनुदानाची रक्कम आठ हजार रुपयांपर्यंत राहील. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, भारसिंगी येथील कृषी मंडळ अधिकारी कृनाल ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com