esakal | 7/12 उताऱ्यातील चूक कशी दुरुस्त करायची? वाचा प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

7/12

7/12 उताऱ्यातील चूक कशी दुरुस्त करायची? वाचा प्रक्रिया

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्‍यक ठरते; अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. मात्र, आता अशाप्रकारच्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. आता तुम्ही ७/१२ देखील ऑनलाइन काढू शकता. मात्र, तुमच्या ऑनलाइन ७/१२ (land records) मध्ये काही चुका असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या? (mutation in land records) यासाठीची सोय देखील महाभूमीच्या वेबसाईटवर आहे. ही दुरुस्ती कशी करायची? याबाबतच आज आपण बघणार आहोत. (how to do mutation in land records)

हेही वाचा: सावधान! पोलिसांना fake call केल्यास होणार गुन्हे दाखल

काय आहे प्रक्रिया?

  • दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला आधी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

  • या पेजवर सर्वात खाली उजव्या बाजूला ७/१२ दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली असे दिसेल त्यावर क्लिक करा.

  • आता तुमच्यासमोर PDE (पब्लीक डेटा एंट्री)असे एक पेज ओपन होईल. त्याच पेजवरील सर्वात खाली दिलेल्या Proceed to Login या बटनावर क्लिक करा.

  • आता तुमच्यासमोर लॉगइन चं पेज ओपन होईल. त्याठिकाणी नवीन अकाऊंट तयार करा.

  • तुम्ही एकदा अकाऊंट सुरू केलं की तुम्ही तुमची नवीन माहिती PDE मध्ये भरू शकता.

  • याद्वारे तुम्ही तुमची प्रोफाईल देखील अपडेट करू शकता.

  • अकाऊंट तयार झाल्यानंतर तुम्ही LogIn करा. त्यानंतर 7/12 mutation या बटनावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप मेसेज येईल. याठिकाणी तुम्हाला (युजर) तुमचा रोल सिलेक्ट करावा लागेल. एक सिटीझन, दुसरा बँक किंवा सोसायटी असे रोल असतात. यानंतर प्रोसेस या बटनावर क्लिक करा.

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी तुमची माहिती भरायची आहे. तुम्हाला 7/12 मधील चूक दुरुस्ती करायची आहे त्यामुळे तोच पर्याय निवडा. जी चूक दुरुस्त करायची ती माहिती भरा.

loading image