नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

note

नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम

नागपूर : आपण एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर कधीतरी फाटली नोट (torn note) बाहेर येते. मात्र, आता या नोटांचं काय करायचं? असा प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्या दुकानदाराकडे गेल्यानंतर तो देखील फाटली नोट घेण्यास नकार देतो. कधी बाजारातून फाटली नोट आपल्याला मिळते. मग, अशा फाटल्या नोटांचं काय करायचं? त्यांना नियमानुसार कसं बदलून घ्यायचं? (how to exchange torn note) हे आज आपण पाहुयात. (how to exchange torn notes by legaly)

एका नोटेचे दोन तुकडे होतात किंवा ती एकापेक्षा जास्त ठिकाणी फाटलेली असते. अशा नोटा आपल्या जवळच्या सरकारी बँकेमध्ये बदलून मिळतील. बँक कर्मचारी नोट बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. कारण आरबीआयने त्यांना तसे आदेश दिले आहेत. अशा दहा, वीस रुपयांची फाटलेली नोट ५० टक्क्यांपेक्षा कमी फाटली असेल तर नोटा बदलून दिल्या जातात. भारतीय रिझर्व्ह बँक, तिच्या सर्व इश्यु ऑफिस मधून व बँक शाखांमधून, फाटलेल्या व मळक्या नोटा बदलून देण्याची सुविधा जनतेला देण्यात आली आहे. नोट परतावा नियम समजण्यासाठी, सोपे करण्यासाठी व लागू करण्यासाठी सर्वसमावेशकतेने त्याचा मोबदला दिला जातो. मात्र, या नोटा ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण खराब झाल्या असेल तर बँक त्याचा मोबादला देणार नाही.

बँक कर्मचारी नोटा बदलण्यास टाळाटाळ करत असेल तर त्यांची रितसर तक्रार करावी. बँकींग लोकपाल किंवा आरबीआयच्या पोर्टलवर तुम्हाला ही तक्रार करता येईल.

नोट जर ५० रुपयांपेक्षा अधिक किंमतीची असेल आणि त्याचा ८० टक्के भाग चांगला असेल तर बँक पूर्ण मोबदला देते. तसेच फाटलेल्या नोटेचा ४० टक्क्यांहून मोठा भाग चांगला असल्यास त्याची अर्धी किंमत मिळेल. नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ, संपूर्ण नोटेच्या क्षेत्रफळाच्या 40 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्याबाबत कोणतेही मूल्य दिले जाणार नाही व तो दावा फेटाळला जाईल

रुपये पन्नास ते रुपये एक हजार मूल्याच्या फाटलेल्या नोटांच्या दाव्यांमध्ये, त्याच एका नोटेचे दोन तुकडे झाले असून, प्रत्येक तुकड्याचे क्षेत्रफळ, त्या मूल्याच्या नोटेच्या क्षेत्रफळाच्या 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अधिक असल्यास, त्याचे पूर्ण मूल्य देण्यात यावे.

'या' नोटा बदलता येणार नाही -

कधीकधी नोट इतकी फाटते की बदलता येत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, पूर्णपणे जळालेल्या आणि पूर्णपणे फाटलेल्या नोटा बदलता येत नाही. त्यामुळे अशा नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जाऊ शकतात.