esakal | ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत, विदर्भातील ४०० पेक्षा अधिक उद्योगांची चाके रुळावर
sakal

बोलून बातमी शोधा

Industry

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत, विदर्भातील ४०० पेक्षा अधिक उद्योगांची चाके रुळावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने लघू, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा (oxygen supply to industries) पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे विदर्भातील ४०० पेक्षा अधिक उद्योगांची चाके पुन्हा फिरू लागली आहे. हॉस्पिटलकडून मागणीच नसल्याने उद्योगांना हवा तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. लहान मोठ्या एकूण दोन हजारावर उद्योजकांमध्ये असलेल्या कामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळू लागले आहे. (oxygen supply to 400 industries in vidarbha)

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

ऑक्सिजनची सर्वाधिक आवश्यकता फॅब्रिकेशन इंडस्ट्रीजमध्ये असते. धातू कापण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज असते. अनेक कास्टिंग कंपन्यांमध्येही मोठ्या भट्ट्या असतात. त्या धगधगत्या ठेवण्यासाठीही ऑक्सिजन लागतो. तसेच लेझर कटिंगद्वारे स्टिलसह विविध धातूची उत्पादने कापण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज असते. जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर येते पाच तर चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती सर्व मिळून दहा ते अकरा ऑक्सिजन प्लान्ट आहे. या सर्वच प्लान्टमधून उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत सुरू झालेला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सात एप्रिलला राज्य सरकारने उद्योगांचा १०० टक्के ऑक्सिजनपुरवठा थांबवून, तो रुग्ण हॉस्पिटलसाठी राखीव ठेवला होता. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर ऑक्सिजन प्लॅन्टमधून १४ हजार पेक्षा अधिक सिलिंडरचा वापर होत होता. आता फक्त १५०० ही सिलिंडरची मागणी रुग्णालयातून नाही. ऑक्सिजन प्लान्टचा उरलेला अतिरिक्त ऑक्सिजनही उद्योगांना दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्यापही ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर निर्बंध आणले आहे. त्यात २० टक्के उद्योगांसाठी ऑक्सिजन तर ८० टक्के हॉस्पिटलसाठी राखीव ठेवावा लागतो आहे. कंपन्यांनापुढे आता उत्पादित केलेल्या ऑक्सिजनचे करायचे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले असताना एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते हे विशेष.

उद्योगांना हवा तेवढे ऑक्सिजनचा पुरवठा अद्याप सुरू झालेला नसला तरी उद्योगाची चाके रुळावर येऊ लागली आहे. ऑक्सिजनचा कोटा वाढवून द्यावा अशी मागणी सरकारकडे केलेली आहे.
-प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने उद्योगांना पुन्हा ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झालेला आहे. त्यामुळे उद्योगांची चाके फिरू लागली असून कोटा वाढविण्यात यावा.
-नितीन लोणकर, माजी अध्यक्ष, बीएमए.
ऑक्सिजनचे होत असलेले उत्पादन आणि मागणी यात मोठी दर आहे. सध्या रुग्ण संख्या कमी झालेली असल्याने हॉस्पिटलकडूनही मागणी कमी झालेली आहे.
-शेखर गोडघाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमोहऑक्स इंडस्ट्रिअल गॅस प्रायव्हेट लिमिटेड.
loading image
go to top