esakal | 'ऑक्सिजन काँसंट्रेटर' ठरतेय संजीवनी, वाचा कसा अन् कधी करावा वापर?

बोलून बातमी शोधा

oxygen concentrators
'ऑक्सिजन काँसंट्रेटर' ठरतेय संजीवनी, वाचा कसा अन् कधी करावा वापर?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरसारख्या मेट्रो शहरात कोरोना (corona) रुग्णांना ऑक्सिजन (oxygen) मिळत नसताना विदर्भातील दुर्गम व आदिवासीबहूल गावांमध्ये रुग्णांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. त्यामुळे शासकीय न्याय साहाय्यक विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना (national service scheme) विभागाने रुग्णांसाठी ऑनलाइन निधी संकलित केला. त्यातून तीन 'ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन' (oxygen concentrator machine) खरेदी करून त्या आदिवासी भागात दान केल्या आहेत. या मशीन आता आदिवासींसाठी प्राणवायुचे काम करीत आहे. मात्र, त्याचा वापर कसा करावा? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतील. (how to use oxygen concentrator)

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

'ऑक्सिजन काँसंट्रेटर' हे ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरतेय -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटने ग्रामीण भागातही विळखा घट्ट केला आहे. आधीच आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यातच दुर्गम आदिवासी भागातील परिस्थिती आणखीच वाईट आहे. त्यांच्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने एनएसएसने ऑनलाइन मदतीसाठी आवाहन केले आणि दीड लाख रुपये गोळा झाले. त्यातून ५१ हजारांचे एक असे तीन 'ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन' खरेदी करून चंद्रपूरच्या बामणी गावात देण्यात आले. याशिवाय २ ऑक्सिजन फ्लो मीटर' दिले. त्याशिवाय गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याला दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर पुरवण्यात आले आहेत. 'ऑक्सिजन काँसंट्रेटर' हे ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरत आहे. या संपूर्ण उपक्रमाला हाताळणारे एनएसएसचे प्रमुख डॉ. मालोजीराव भोसले यांनी आता दर पाच मिनिटाला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरसाठी मागणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी काही यंत्र विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वजा गावंडे, गौरव निकम, संकेत जाधव काम करीत आहेत.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

ऑक्सिजन काँसंट्रेटर कसे काम करते?

हवेत साधारणपणे 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन काँसट्रेटर्स हे उपकरण सभोवतालची हवा शोषून घेते. त्यानंतर त्या हवेला फिल्टर करून ऑक्सिजन घेऊन नायट्रोजन बाहेर फेकला जातो. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.

वापर कधी करावा?

कोरोना रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर कोणताही रुग्ण हे ऑक्सिजन काँसंट्रेटर्स वापरू शकतात आणि त्यांचा जीव वाचू शकतो, असे तुम्हाला वाटते का? असे वाटत असेल तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण, याबाबत आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितले, की ऑक्सिजन काँसंट्रेटर्सचा वापर केवळ कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांसाठीच केला जाऊ शकतो. दर मिनिटाला जास्तीत जास्त पाच लिटर ऑक्सिजनची गरज असेल तेव्हाच या उपकरणाचा वापर केला जाऊ शकतो.

राज्यभरातून स्वागत - राज्यात ४००० तसेच देशामध्ये ३८ हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग आहेत. न्याय साहाय्यक विज्ञान संस्थेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे राज्यभरातून कौतूक होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनीही प्रशंसा केली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे केवळ सदस्य न होता अशा कठीण काळात खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत.
-डॉ संजय ठाकरे, संचालक, शासकीय न्याय साहाय्यक विज्ञान संस्था.