esakal | जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान सुरू असतानाही वाढणार संकट; कारण, धान्य आहे मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

How to unload grains without leber

सध्या गोदामांमध्ये असलेले धान्य किराणा दुकानातून नागरिक खरेदी करीत आहेत. परंतु, गोदामातील धान्य संपल्यानंतर नागरिकांवरही संकटाची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेतील बैठकीत विविध व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या धान्याची मागणी कमी असून, पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. 

जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान सुरू असतानाही वाढणार संकट; कारण, धान्य आहे मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र बंदी असली, तरी जीवनावश्‍यक धान्य, वस्तू आदी वाहतुकीला बंदीतून वगळण्यात आले. मात्र, धान्य वाहतूक करून आणले तरी मजूर वर्ग सुरक्षेच्या दृष्टीने घरांमध्येच असल्याने दुकानात उतरविणार कोण, असा पेच व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. धान्य उतरविण्यासाठी मजुरांचा अभाव, त्यातून व्यापाऱ्यांपुढे निर्माण झालेली अडचण बघता नागरिकांवरही धान्याबाबत संकट निर्माण होण्याची शक्‍यता बळावली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गरीब, मजूर वर्गालाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे तर महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून या मजूर वर्गापर्यंत जेवण, धान्याची किट पोहोचवून देत त्यांची काळजी घेतली जात आहे. त्याचवेळी धान्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे मजूर नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांकडे ट्रकने धान्य आणले जाते. परंतु, मजूर उपलब्ध नसल्याने धान्य बोलावल्यानंतरही ते गोदामात ठेवायचे कसे, या प्रश्‍नाने व्यापाऱ्यांना हैराण केले आहे. 

जाणून घ्या - सहमतीने ठेवले पती-पत्नीप्रमाणे संबंध; मात्र, कागदपत्रांअभावी अडले लग्न, नंतर घडला हा प्रकार...

महापालिकेत नुकतीच शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतही त्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. परंतु, अद्याप तरी यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. नागरिकांच्या घरापर्यंत येणारे धान्य याच व्यापाऱ्यांच्या गोदामातून येत आहे. मजूर नसल्याने व्यापारीही धान्य बोलावण्याची जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. परिणामी सध्या गोदामांमध्ये असलेले धान्य किराणा दुकानातून नागरिक खरेदी करीत आहेत. परंतु, गोदामातील धान्य संपल्यानंतर नागरिकांवरही संकटाची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेतील बैठकीत विविध व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या धान्याची मागणी कमी असून, पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. 

अडचण आल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी बोला

सध्या बाजारात कमी प्रतीचा गहू उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचा गहू मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून वाहतूक नियमित झाल्यास उपलब्ध होऊ शकेल, असेही मनपा आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. आयुक्तांनी या वेळी जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध नाही. चांगला गहू जेथून मागवायचा आहे तेथून मागवा. काही अडचण आली तर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यावर मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही व्यापाऱ्यांना दिली. परंतु, धान्य गोदामात ठेवणाऱ्या मजुरांचा प्रश्‍न कायम आहे.

अधिक वाचा - महावितरणने घेतला हा मोठा निर्णय...वाचा

व्यापाऱ्यांसाठी वाहन पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष आहे. गरज पडल्यास व्यापाऱ्यांना 0712-2561698 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय 8108683919 हा क्रमांकही उपलब्ध आहे. वाहनाची पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करता येईल. त्यासाठी mh31@mahatranscom.in अथवा https://transport.maharashtra.gov.in या वेबलिंकवर जाऊन अर्ज करता येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी सांगितले. 

loading image