HSRP Number Plate
sakal
- अखिलेश गणवीर
नागपूर - हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) बाबत वाहनधारकांचा मिळत असलेल्या अल्प प्रतिसादाने सरकारकडून पाच वेळा मुदत वाढवून दिली गेली. आता ३० नोव्हेंबरची डेडलाईन ठरवून देण्यात आली आहे. त्यालाही केवळ चारच दिवस शिल्लक आहेत. १६ लाख ३७ हजार ६९९ वाहनांची अद्यापही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता चारच दिवसांत इतक्या वाहनांना ‘एचएसआरपी’ कशी बसविणार? हा खरा प्रश्न आहे.