नागपूर - राज्यात शालेय शिक्षण विभागात बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार उघडकीस आला. अनेकांना बनावट कागदपत्राच्या आधारे नोकऱ्या लावून त्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले..असाच प्रकार महाविद्यालयस्तरावरही झाला असून विनाअनुदानित महाविद्यालयातून थेट प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना थेट अनुदानित महाविद्यालय नियुक्ती करीत बोगस एचटीई-सेवार्थमध्ये बनावट आयडी तयार करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी उच्च शिक्षण विभागाकडून पाच विभागांची चौकशी करण्यात आली आहे..राज्यातील नागपूरच्या शालेय शिक्षण विभागामध्ये बंदी असताना, शेकडो शिक्षकांना नियुक्त्या देत, त्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले. त्या माध्यमातून त्यांचे पगार काढून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, अटकसत्रही सुरू झाले. त्यानंतर चार उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकांना अटक करण्यात आली..राज्यातील शालेय शिक्षण विभागाप्रमाणेच घोटाळ्याचे लोन कनिष्ठ महाविद्यालय आणि आता वरिष्ठ महाविद्यालयातही पोहचले आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरातील सहसंचालक कार्यालयातही अशाच प्रकारे ‘बोगस सेवार्थ’ आयडीच्या माध्यमातून अशाच प्रकारे नियुक्त्या देण्यात आल्याचे आढळून आले आहे.राज्यात २०१६ पासून कर्मचाऱ्यांसह प्राध्यापकांच्या पदभरती बंद आहेत. त्यानुसार कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या पदांना अनुदानित महाविद्यालयात मान्यता देण्यात आलेली नाही. असे असताना, शेकडो कर्मचारी आणि प्राध्यापकांना अनुदानित महाविद्यालयांमध्ये नियुक्ती देण्यात आलेली आहे..या नियुक्तीनंतर त्यांची नावे ‘एचटीई-सेवार्थ’मध्ये टाकून त्यांचा पगार काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याशिवाय सहसंचालक स्तरावरही त्याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे..तपासणीसाठी सहसंचालकांच्या समितीएचटीई-सेवार्थ प्रणालीचे काम सहसंचालक स्तरावर राबविण्यात येते. २०१६ पासून नियुक्तीला बंदी होती तर त्यातून नव्या नियुक्तांना कुणी मान्यता दिल्यात, त्यांची एचटीई सेवार्थमध्ये कुणी नोंद केली असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाकडून मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या पाचही विभागासाठी दुसऱ्या विभागातील सहसंचालकस्तरावर पाच समिती तयार करण्यात आल्यात. या प्रत्येक समितीकडून पाचही विभागांची तपासणी करण्यात आली..अहवालात अनेक धक्कादायक बाबी११ जुलैला याबाबत आदेश काढून १७ जुलैपर्यंत त्याचा विविध संचालकांद्वारे संचालकांना अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात काही विभागांमध्ये बंदी असतानाही तिथे नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे आढळून आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.