

नागपूर : शहरात हुक्का पार्लर जोरात सुरू असून गुन्हेशाखेच्या पथकाने शहरात दोन हुक्का पार्लरवर छापा टाकून बारा जणांना अटक केली. विशेष म्हणजे, यातील सदर येथे हुक्का पार्लर चालविणारा आरोपी अंशुल बावनगडे हा पत्नीच्या माध्यमातून लक्ष्मीनगरात ‘स्पा’च्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसायातही गुंतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली असून पती अंशुल अद्याप फरार आहे.