

Officials investigate exam centres in Washim after identical answer sheets raise copying concerns.
sakal
वाशीम : जिल्ह्यातील टो-जुमडा फाटा येथील श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी (ता. १६) बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी भरारी पथकाने या केंद्राची अचानक पाहणी केली असता केंद्रावरील सर्व परीक्षार्थ्यांनी उत्तरे एकसारखी लिहिल्याचे आढळून आले. सदर प्रकरणात केंद्रावरील २६ शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेला दिले आहेत.