

Nagpur Shocked as Love Trap Ends in Blackmail and Photo Circulation
Sakal
नागपूर: ओळखीचे रूपांतर प्रेमात करून एका विवाहित महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्र मिळवून ते समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदीप हनुमान पांडे (वय ३४) आणि नीरज पांडे (वय ३०, दोघेही मूळ रा. रिवा, सध्या रा. सुरत) यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.