रस्ता रुंदीकरणाचे काम करायचेच नव्हते तर आधी ठराव घेतला कशाला?

पारशिवनीःस्थायी समितीच्या सभापतींनी ठराव नामंजूर केल्यानंतर  घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी बाजार चौकात करण्यात आलेले एक दिवसीय धरणे आंदोलन
पारशिवनीःस्थायी समितीच्या सभापतींनी ठराव नामंजूर केल्यानंतर घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी बाजार चौकात करण्यात आलेले एक दिवसीय धरणे आंदोलन
Updated on

पारशिवनी (जि.नागपूर): आधी विकासकामाचा ठराव घेण्यांपासून निवीदा काढण्यापर्यंत सारे काही निपटले. ठरावातील कामासाठी निधी आला. मात्र काय झाले , कुणास ठाऊक ! नगरपंचायतीच्या स्थायी समितीत ठराव आल्यानंतर मात्र स्थायी समितीच्या सभापतींनी ठराव नामंजूर केला. यावरुन वातावरण फार भडकले.

निविदेत चुका आहेत व खूप बिलो निविदा आहेत
शहरातील शिवाजी चौक ते संत तुकाराम सभागृह या रस्त्याचे रुंदीकरण करण्याकरिता एक कोटी ५६ लाख रुपयाच्या निविदा  व दलित वस्ती निधीअंतर्गत विकासकामाबाबत ५२ लाख रुपयांच्या निविदा नगरपंचायतीने विविध वृत्तपत्रात व शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या. रस्ता रुंदीकरण ठरावाच्या कामात प्रथम वेळी पाच व द्वितीय वेळी नऊ निविदा प्राप्त झाल्या. त्यातील फक्त दोनच निविदा पात्र होत्या. त्यामुळे तृतीय फेरनिविदा करण्यात आली. यावेळी रस्ता रुंदीकरणात सहा निविदा पात्र ठरल्या.  दलित वस्ती निधीअंतर्गत कामात प्रथम व द्वितीय वेळी एकच निविदा पात्र ठरली. त्यामुळे यांच्यादेखील तिसऱ्यादा निविदा काढण्यात आल्या. त्यात आठ निविदा पात्र ठरल्या. हे दोन्ही ठराव मंजूरीकरिता स्थायी समितीत ठेवण्यात आले. प्रथम ठरावास सभापती देवानंद वाकोडे यांनी निविदेत चुका आहेत व खूप बिलो निविदा आहेत, असे मत मांडून ठरावास विरोध केला. यास माधुरी भीमटे, मनीषा धूरई, आशा वैद्य या भाजप सभापतींनी सहमत दिले.  नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर यांनी जनतेला त्रास होत असल्याने काम लवकर व्हावे, असे मत मांडून ठरवास संमती दिली. बहुमतामुळे निविदा रद्द करण्यात आल्या. दलित वस्तीच्या कामाच्या ठरावास देखील सभापती देवानंद वाकोडे व इतर सभापतींनी विरोध दर्शवून ठराव नामंजूर केला.

अधिक वाचाः बेसबाॅलच्या दंड्याने केलेल्या मारहाणीत अखेर युवकाचा मृत्यू

ठरावात कार्यालयीन अधीक्षकांमार्फत मत मांडले
जास्तीत जास्त कंत्राटदारांना निविदा प्रकियेत भाग घेता यावा व कामाचा दर्जा योग्य व्हावा, म्हणून तृतीय फेरनिविदा काढण्यात आल्या. यात महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करण्यात आले, असे मत मांडले. त्यामुळे नगरपंचायतने केलेली निविदा प्रक्रिया योग्य आहे. काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे, तरीही स्थायी समितीच्या सदस्यांनी बहुमताच्या जोरावर  ठराव नामंजूर केला. या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगराध्यक्ष प्रतिभा संजय कुंभलकर, गटनेते दीपक शिवरकर, नगरसेवक विजय भुते, राहुल ढगे,अरुणा भिवगडे, रुपाली भड, टीकाराम परतेकी या नगरसेवकांसह संजय कुंभलकर, विजयकुमार बोथरा, रोशन पिंपरामुळे, आशीष भड आदींनी सहभाग घेतला.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com