उपचार करायचे नसन तर जहर तरी द्या...

If you do not want to be treated, then poison ...
If you do not want to be treated, then poison ...

नागपूर : डॉक्‍टर देवाचा दूत असाच गरिबांचा समज आहे. परंतु, अडीचशे किलोमीटर अंतर कापून उपचारासाठी आलेल्या एका चाळिशीतील किडनीग्रस्त युवकाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनीरोग विभागात भरती करून घेण्यात आले नाही. डॉक्‍टरांकडून उपचाराऐवजी उपेक्षेची वागणूक मिळाली. त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रात्र, उघड्यावर काढणाऱ्या या उपाशी रुग्णाला दिवसभर सुपरच्या वऱ्हांड्यात पडून राहावे लागले. त्या युवकाच्या बहिणीने उपचार नाकारल्याची व्यथा बोलून दाखवताच या पवित्र व्यवसायातील माणुसकीच संपली की, काय? असा सवाल आहे. उपचार करायचे नसन तर जहर तरी द्या, अशी मागणी त्या रुग्णाची बहीण करत होती.

चाळिशीतील त्या रुग्णाचे नाव पंजू तायवाडे. बैतुल येथून आला. शेतमजूर आहे. मध्यरात्री कधीतरी सुपरच्या आवारात आला. सोमवार (ता.2)ची रात्र उघड्यावर काढली. मंगळवारी 3 मार्च रोजी सकाळीच कार्ड काढले. उपचार मिळतील भाऊ बरा होईल या आशेवर पंजूला त्याची बहीण "सकू' यांनी डॉक्‍टरकडे तपासणीसाठी नेले. मात्र, किडनी विभागातील खाटा हाउसफुल्ल असल्यामुळे पंजूला भरती करून घेण्यात आले नाही. याला उपचार नाकारले, ही व्यथा बोलून दाखवताना त्या बहिणीचे डोळे पाणावले. डोक्‍यावरचा पदर आपोआपच डोळ्याजवळ आला. चार महिन्यांपासून पंजूला हा त्रास आहे. नातेवाइकांनी यापूर्वी उपचारासाठी वर्ध्यातील एका रुग्णालयात नेले. काही दिवस उपचारानंतर नातेवाइकांना येथील डॉक्‍टरांनी सुपर स्पेशालिटीत उपचाराचा सल्ला दिला. मात्र, येथे आल्यानंतर पंजूला अशी उपेक्षेची वागणूक पहिल्याच दिवशी डॉक्‍टरांकडून मिळाली.

चटईवर काढली रात्र

सुपर स्पेशालिटीत रात्री रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा नाही. सुपरच्या भिंतीआड रात्र काढावी या उद्देशाने प्रवेश केला. मात्र, प्रवेश नाकारला. पंजूला लघवीची पिशवीही लावली आहे. रात्री रुग्णाला प्रवेश मिळाला नसल्याने सुपरच्या बाहेर आवारात "चटई'वर रुग्णाला झोपवले. कशीबशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी रुग्णाला किडनी विभागात डॉक्‍टरांना दाखवले गेले. रुग्णाला चालता येत नाही. डॉक्‍टरांनी वॉर्डात खाट रिकामी नसल्याचे सांगत बाहेरचा रस्ता दाखवला. अत्यवस्थ पंजूला अशा अवस्थेत घरी कशी घेऊन जाऊ हा बहीण सकू यांचा सवाल. गरिबांना आधार असलेल्या सुपरमध्येही डॉक्‍टरांकडून उपचार नाकारले जात असतील तर गरिबांनी कुठे जावे असे येथील रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com