शिवरात्रीला भांग पिताना घ्या या सहा गोष्टींची काळजी... अन्यथा भोगावे लागतील परिणाम

bhang
bhang

नागपूर - जय जय शिव शंकर
कॉंटा लागे न कंकर
के प्याला तेरे नाम का पिया


राजेश खन्ना आणि मुमताजच्या अभिनयाने अमर केलेले हे गीत महाशिवरात्र जवळ आली की हमखास आठवते. कारण शंकराला भांग आवडते, अशी मान्यता आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचे सर्व भक्‍त भांग प्राशन करतात.

समुद्र मंथनातून निघालेले विष शंकराने प्राशन केले त्यानंतर होणारा दाह शमविण्यासाठी अनेक उपचार करण्यात आले. त्यामध्येच विविध जडीबुटींपासून तयार करण्यात आलेली भांगही महादेवाने प्राशन केली. तेव्हापासून भांग आणि महादेव हे समीकरण झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला भांगेचा नैवेद्य दाखविला जातो आणि भक्‍त ती भांग प्रसाद म्हणून सेवन करतात.

सविस्तर वाचा - दारूच्या एकच प्यालासाठी सात वर्षाच्या मुलाचे अपहरण

विष उतरविण्यासाठी महादेवाने भांग सेवन केली आणि औषधीयुक्‍त वनस्पतींपासून तयार केली असली तरी आज जी भांग उपलब्ध आहे त्यामुळे मात्र नशा चढते. भांगेचा आरोग्यावरही दूरगामी वाईट परीणाम होतो. भांगेचे अधिक सेवन केल्याने अपचन, उलट्या, डोकेदुखी, दिसणे, ऐकणे, समजणे या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भांगेचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी.

- उपाशीपोटी भांगेचे सेवन करू नये. भांग सेवन केल्यानंतर काहीतरी खात राहावे. मात्र तेलकट पदार्थ खाणे टाळावे. भांग दुधाबरोबर सेवन करावी.

- हृदयरोगींनी भांग सेवन करू नये. तसेच रक्‍तदाबाच्या रुग्णांनी आणि मधुमेहींनीही भांगेचे सेवन टाळावे.

- अनेकजण भांगेबरोबर दारू सेवन करतात मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. भांगेबरोबर कधीही दारू पिऊ नये.

- भांगेचा प्रभाव कमी करण्यासाठी लिंबूपणी घेतले जाते, मात्र भांग सेवन केल्यावर संत्र्यासारखी आंबट फळे खाणे टाळावे.

_ भांग घेतल्यानंतर चहा-कॉफी पिणे टाळावे, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
*भांग घेतल्यानंतर फास्ट फूड खाणे टाळावे.

- भांगचा प्रभाव कमी करायचा असेल तर भरपूर पाणी प्यावे. गरम पाण्याने स्नान करावे आणि भरपूर फळे खावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com