
दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील सामदा सौंदळी लघुप्रकल्प धरण भिंतीवरील टेल चैनलमधील झाडेझुडूपे काढण्याचे पत्र लघुपाटबंधारे विभागाद्वारे कंत्राटदाराला देण्यात आले होते. मात्र या कामाच्या आड अवैधपणे मोठे वृक्ष तोडून त्या लाकडांपासून कोळसा बनविण्याचे काम छुप्या पद्धतीने परिसरात सुरू आहे.