सावजी भोजनालयावर छापे | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मद्यसाठा जप्त

नागपूर : सावजी भोजनालयावर छापे

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता सावजी भोजनालयाला लक्ष्य केले आहे. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन लाख २२ हजार ९६ रुपये किंमतीचा मद्यसाठा व मुद्येमाल जप्त केला आहे. तसेच जिल्ह्यात २० गुन्हे दाखल करुन १७ आरोपींना अटक केली आहे.

उमरेड येथील नायडू बाजार पिंपळा फाटा व खापा, नागलवाडी, सर्रा, लोहगाव फाटा, घुबडमेट पारधी वस्तीमागे तर शहरामध्ये बिडगाव, भंडारा बायपास रोड, जबलपूर-नागपूर रोड, हुडकेश्वर, इमामवाडा, या भागांमधील सावजी भोजनालयांवर छापे टाकण्यात आले.

हेही वाचा: अहमदनगर : नागवडे कारखाना निवडणूक; विरोधकांना रसद नेमकी कुणाची?

महेंद्र सावजी भोजनालय, पवन सावजी भोजनालय, दुर्गेश सावजी भोजनालय, ओम शक्त्ती सावजी भोजनालय, चमन सावजी भोजनालय, चमन हिंदु हॉटेल, रमेश सावजी भोजनालय, मनोहर सावजी भोजनालय, एकनाथ सावजी भोजनालय, तंदुरी नाईस, मेट्रो चायनीज, जगदीश सावजी ढाबा, लड्डू का ढाबा, एन. एच. ४७ रेस्टॉरेंट, मेजवानी किचन, टेस्टी टेबल रेस्टारेंटवर छापे टाकण्यात आल्या.

राजेंद्र जगजीवन तिवारी, प्रशांन देवराव आकोटकर, जगदीश परसराम जामगडे, मिलींद मोरेश्वर मेश्राम, बबलू अमरसिंग राजपूत, राकेश मोतीराम उईके, राजकुमार प्रकाश योगी श्रावण सकरु पोहतकर, भीमराव कोंडीबा लांजेवार यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

मद्यसेवन परवाने काढा ऑनलाइन

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देशी व विदेशी मद्यसेवन परवाने ऑनलाईन पध्दतीने काढण्याची सुविधा exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. त्याबाबत कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारकांना अवगत करण्याबाबत कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. तसेच सर्व कार्यक्षेत्रीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत ऑफलाईन पध्दतीने देशी व विदेशी मद्यसेवन परवाने पुरविण्यात येत असून सदर परवाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील अबकारी अनुज्ञप्तीवर देखील नियमितपणे निरीक्षणे करण्यात येऊन अनियमितता आढळल्यास विभागीय प्रकरणांची नोंद करण्यात येत आहे.

loading image
go to top