आई तान्हुल्याला झोपवते पदराची हवा घालून!

आई तान्हुल्याला झोपवते पदराची हवा घालून!

मौदा (जि. नागपूर) : तालुक्यात कडकडीत लॉकडाउनमध्ये (lockdown) विद्युत कंपनीकडून रिडिंगपेक्षा जास्त बिल पाठवण्यात आले. नागरिक घरीच असल्याने वीज नेहमीच असणे गरजेचे आहे. बोरगाव परिसरातील अनेक गावात वीज (Electricity) नसल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांना आईला साडीच्या पदराने हवा देत झोपवावे लागते, अशी बिकट परिस्थिती ग्रामीणमध्ये पहावयास मिळत आहे. (In rural areas the night has to be taken out in the dark)

मौदा तालुक्यातील बोरगाव फिडरवरील नेहमीच वीज जाते. परिसरातील सरपंचांनी कनिष्ठ अभियंता अविनाश तांडेकर यांना नेहमी वीज जाण्याचे कारण विचारले असता थोडीजरी हवा आली, हलका पाऊस आला की वीज बंद होते, असा प्रकार कित्येक दिवसांपासून सुरु असल्याचे कारण सांगितले. लाईनमनशी नागरिकांनी संपर्क असता फोन उचलत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शेतकरी दिवसभर शेतात राब-राबतात आणि रात्री अंधारात झोपतात. लहान मुलं, वृद्धांना याचा त्रास सहन करावा लागतो.

आई तान्हुल्याला झोपवते पदराची हवा घालून!
आली कशी ही वेळ! शेतकरी नेत्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर

रात्री लाईट गेली तर कधी रात्रभर येतच नाही. याचे कारण फिडरला लाईनमन उपस्थित नसतो. तो उपस्थित राहिल्यास वीज गेली की लवकर दुरूस्ती करता येईल. पण या फिडरचे काही लाईनमन तालुक्यात जाऊन राहतात. या भागात नेहमीच असाच प्रकार सुरू असतो. वीज गेली की सरपंचांना गावातील नागरिकांचे वारंवार फोन येतात आणि सरपंच विद्युत कर्मचारी यांना विचारणा करतात, हे असेच सुरु राहते.

वीज गुल होण्याचे कारण?

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात नवीन वीजजोडणी मंजूर केली. काम पूर्ण झाले. तरीही नवीन तार जोडणी केली नाही. नवीन जोडणी केली असता असा नेहमी लाईट जाण्याचा प्रकार होणार नाही, असे विद्युत कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मौदा येथील वरिष्ठ अभियंत्यांनी या विभागात नेहमी लाईट का जाते, याची चौकशी करून दुरूस्ती करावी, अशी मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, विरसीचे सरपंच किसणा करडभाजने, पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, मांगलीचे सरपंच अनुसया खंडारे, धानलाचे सरपंच वनिता वैद्य, मांगलीचे माजी सरपंच रविंद्र फटिंग, प्रकाश तातेनेनी यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

(In rural areas the night has to be taken out in the dark)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com