Nitin Gadkari
sakal
नागपूर: नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा विचार डोळ्यापुढे ठेवला. जात-पात, धर्माचा विचार केला नाही. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कल्याण डोळ्यापुढे ठेवले. राजकीय भावनेतून कामे केली नाही आणि भेदभावही केला नाही. नागपूरच्या जनतेला आम्ही आपला परिवार मानले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.