Income Tax: आयकर विभागाकडून हजार कोटींचा घोटाळा उघड; वर्धा व अकोला उपनिबंधक कार्यालयांवर छापा
Income Tax Raid: आयकर विभागाने अकोला व वर्धा येथे छापेमारी करून १,००० कोटी रुपयांच्या संपत्ती व्यवहारांचा उघडकीस आढावा घेतला. बुलडाण्यात एका बनावट चार्टर्ड अकाउंटंट फर्मवर छापा टाकून ४०० कोटींचा घोटाळाही उघड झाला.
नागपूर : सरकारचा कर चुकवणाऱ्यांविरोधात आयकर विभागाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. अकोला व वर्धा येथील उपनिबंधक कार्यालयांवर छापे टाकून तब्बल १,००० कोटीच्या संपत्ती व्यवहारांचा आढावा घेतला गेला आहे.