esakal | प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाने कोलमडली रुग्णसेवा; मेडिकलच्या ट्रॉमातील कोविड कॅज्युल्टी बंद

बोलून बातमी शोधा

Representative Image
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाने कोलमडली रुग्णसेवा; मेडिकलच्या ट्रॉमातील कोविड कॅज्युल्टी बंद
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना (trainee Doctors) ५० हजार रुपये मानधन द्यावे, कोरोना वॉर्डातील (Corona ward) रुग्णांना सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आरोग्य विमा (medical insurance) कवच द्यावे, कोरोना विशेष भत्ता द्यावा या मागण्यांसाठी राज्यभरात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मंगळवारी संप पुकारला (Potest) आहे. या संपात नागपुरातील मेडिकल आणि मेयोतील साडेतीनशेवर प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. कोरोना रुग्णांची गर्दी पेलवत नसल्याने मेडिकलमधील कोविड कॅजुल्टी बंद करून आपत्कालीन विभागात (Emergency Ward) हलवण्यात आली. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढणार आहे. (Inconvenience of corona patients due to protest of Trainee doctors in Nagpur)

हेही वाचा: नारीशक्तीने उभारली शेतकरी उत्पादक कंपनी; ऑनलाइन नोंदणी करताच भाजीपाला घरपोच

मेडिकलमध्ये सुमारे ९०० तर मेयोत ६०० खाटा आहेत. या तुलनेत दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाधित असलेले वॉर्ड हाऊसफुल्ल आहेत. सर्वच विभागातील डॉक्टरांची ड्यूटी कोरोना वॉर्डात लावण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांच्या हाताखाली प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेवा देतात. रात्रकालीन सेवेसाठी हेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर कर्तव्यावर असतात. मात्र संपावर गेल्याने असल्याने निवासी तसेच वरिष्ठ डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे.

मेडिकलमधील २००, तर मेयोमधील १५०, असे एकूण ३५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स संपात सहभागी झाले आहेत. राज्यात दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी एकच नियम लागू करावा, अशी एकमुखी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे प्रतिनिधी शुभम नागरे यांनी केली आहे. ट्रॉमा युनिटमधील कॅज्युल्टी बंद करण्यामागचे कारण संप नाही, असे सांगण्यात आले. मात्र कोविड आणि नॉन कोविड रुग्ण एकाच कॅज्युल्टीमध्ये तपासण्यात येतील. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे.

हेही वाचा: ‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

मदतनीसांचे हात थांबले

मेडिकल-मेयोतील प्रत्येक विभागात निवासी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टरांसह परिचारिकांनाही मदतनीसांची भूमिका पार पाडणारे प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसवेवर परिणाम होतो. प्रत्यक्ष रुग्णसेवेत किंवा शस्त्रक्रियेत सहभागी होत नसले तरी त्यांना मदत करण्याचे मोलाचे काम आम्ही करीत असतो. यामुळे त्यांच्या तुलनेत मानधन देण्यात यावे हीच मागणी लावून धरणार असल्याचे सांगण्यात आले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता तसेच मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन देण्यात आले.

(Inconvenience of corona patients due to protest of Trainee doctors in Nagpur)