बोंबला! मुखाच्या कॅन्सरवर केला उपचार अन्‌ 'कोरोना'बाधित असल्याचे झाले निदान, आता...

Increase of four corona patients in Nagpur city
Increase of four corona patients in Nagpur city

नागपूर : उपराजधानीतील खासगी कॅन्सर रुग्णालयात एकावर मुखाच्या कॅन्सरवर उपचार करण्यात आले. मात्र, या कॅन्सरग्रस्ताला कोरोनाची बाधा असल्याचे निदान उशिरा झाले. यामुळे या कॅन्सरग्रस्तावर उपचार करणाऱ्या चार डॉक्‍टरांसह 20 आरोग्य कर्मचाऱ्यांना याच रुग्णालयात विलगीकरण केल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे मंगळवारी शहरात आणखी चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 133 झाली आहे. 

नागपूर शहरात सुरुवात दिवसाला एक, दोन असेच कोरोना बाधित आढळून येत होते. यामुळे बाधितांची संख्या कमीच होती. मात्र, मरकजवरून आलेले नागरिक सतरंजीपुऱ्यात आल्यापासून शहरात रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली. दररोज चार ते पाच असे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. पर्यायाने शहरावरील धोका वाढला आहे. 

सुरुवातीला शहरासाठी रविवारच घातवार ठरत होता. कारण, याच दिवशी दहाच्या वर रुग्ण आढळून येत होतो. मात्र, दोन दिवसांपूर्वी चक्‍क 19 रुग्णांची भर एकाच दिवशी पडली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी हा उच्चांक 14 होता. एकट्या सतरंजीपुऱ्यातून 60 टक्‍के रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेने कठोर पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. 1200 नागरिकांना विलगीकरण कक्षात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

मंगळवारी आढळलेल्या चार रुग्णांमुळे नागपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या 133 वर पोहोचली आहे. दुसरीकडे कोरोनामुक्‍त असलेल्या भंडाऱ्या जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच यवतमाळमध्येही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे विदर्भालाच कोरोना आपल्या कवेत घेत असल्याचे दिसून येत आहे. 

पॉझिटिव्ह मोमीनपुराचार रहिवासी

नागपूर येथील कामठी रोडवर असलेल्या "एचसीजी नार्ची' या खासगी कॅन्सर रुग्णालयात 40 वर्षीय कॅन्सरग्रस्तावर उपचार सुरू होते. त्याला जिभेचा कॅन्सर होता. 14 एप्रिल दरम्यान त्याच्यावर एचसीजी नार्ची रुग्णालयात शस्त्रक्रिया केली गेली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला सुट्टी देण्यात आली. दरम्यान 24 एप्रिल रोजी त्याला श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. सोबतच सर्दी व इतर कोरोनाची लक्षणे आढळून आली. यामुळे तो पून्हा नार्ची रुग्णालयात उपचारासाठी आला. कोरोनासदृश्‍य लक्षणे बघता त्याची डॉक्‍टरांनी "मेट्रोपॉलिस' या खासगी प्रयोगशाळेच्या माध्यमातून तपासणी करून घेतती. त्याचा अहवाल रविवारी मध्यरात्रीनंतर कोरोनाबाधित आला. यामुळे नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

त्यांना रुग्णालयातच केले विलगीकरण

कॅन्सरवरील उपचारादरम्यान या रुग्णावर चार डॉक्‍टर तसेच 20 आरोग्य सेवा, प्रयोगशाळा कर्मचारी असे 20 जण संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने खासगी रुग्णालय गाठले. या रुग्णावर झालेल्या उपचारासह त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेत 4 डॉक्‍टरांसह एकूण 20 जणांना याच रुग्णालयातच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली. खासगी रुग्णालयाचे संचालक डॉ. अजय मेहता यांनी विलगीकरणात ठेवण्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

मंगळवारी आढळले चार रुग्ण

शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज चार-पाच रुग्णांची भर पडतच आहे. यावरून उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचे दिसून येते. नारिकांना समोर येण्याचा आवाहनही न केल्याने महापालिकेने कठोर पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. असे असले तरी आज वाढलेल्या चार रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता 133 झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com