
Impact of Digital System Failure on Rakhi Deliveries: रक्षाबंधनाच्या पर्वावर बहीण-भावाच्या नात्याला राखीच्या बंधनाने घट्ट करण्यासाठी टपाल विभागाकडून विशेष तयारी केली जाते. यंदा मात्र, नवीन डिजिटल प्रणाली ‘एपीटी अप्लिकेशन लागू होताच सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे स्पीड पोस्ट बुकिंग ठप्प झाले आहे. परिणामी जीपीओसह नागपूरच्या विविध पोस्ट ऑफिसेसबाहेर राखी पाठवण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मोठी रीघ लागल्याचे दिसले.
भारतीय टपाल विभागाने जलद आणि ग्राहकाभिमुख सेवेसाठी आयटी २.० उपक्रमांतर्गत नवी प्रणाली लागू केली. परंतु, दोन दिवस सेवा बंद ठेवून सोमवार (ता.४) पासून सुरू झालेल्या या प्रणालीच्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. रक्षाबंधन ९ ऑगस्टला आहे, त्यामुळे राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसेसमध्ये गर्दी वाढली. मात्र, सर्व्हरमधील अडथळ्यांमुळे अनेकांना स्पीड पोस्ट ऐवजी ऑर्डिनरी पोस्टचा आधार घ्यावा लागल्याचे दिसून आले.
वेळेत राखी पोहोचण्याची चिंता : नागपुरातून अमेरिका, कॅनडा येथे राख्या पाठवल्या जातात. यासाठी टपाल विभागाने १२ रुपये किमतीचे विशेष राखी पाकीट तयार केले आहे. पण, सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक बहिणींना सामान्य पद्धतीने राखी पाठवावी लागली. आता ही राखी वेळेत भावापर्यंत पोहोचेल का, ही चिंता आहे.
दूरच्या शहरात किंवा गावात राहणाऱ्या भावाला राखी पाठविण्यासाठी सोमवारी बहिणींनी पोस्टाच्या विविध कार्यालयात गर्दी केली. मात्र, स्पीड पोस्टच्या सर्व्हरमध्येच एरर असल्याने अडचणी आल्या. अनेक ठिकाणी ही समस्या दिवसभर कायम होती. सर्व्हरमध्ये अधून-मधून अडथळा येत असल्याने प्रचंड मोठी गर्दी वाढली होती. नवीन प्रणाली राखीनंतरच लागू करायला हवी होती, असे मत अनेक ग्राहकांनी व्यक्त केले.
राखीच्या निमित्ताने वाढणारा ताण लक्षात घेता, जीपीओसह विविध डाक कार्यालयांत राखी पाठविण्यासाठीच्या स्पीड पोस्ट व ऑर्डिनरी बुकिंगसाठी अतिरिक्त खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. बहिणींची राखी त्यांच्या भावाला वेळेत पोहोचवण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न आहेत.
- शोभा मधाळे,
पोस्ट मास्टर जनरल, विदर्भ क्षेत्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.