AI Anganwadi: ‘एआय’ आधारित अंगणवाडीचे लोकार्पण; वडधामन्यात देशातील पहिला उपक्रम, पालकमंत्री, अधिकाऱ्यांची उपस्थिती
Nagpur News: देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अंगणवाडी वडधामना (नागपूर) येथे सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. या अंगणवाडीत स्मार्ट स्क्रीन, डिजिटल शिक्षण, आणि एआय सॉफ्टवेअरचा वापर आहे.
नागपूर : वडधामना येथे देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अंगणवाडी उभारण्यात आली असून, या अभिनव प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (ता.२७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडले.