
नागपूर : जंगल सफारीत जिप्सीतून वा हत्तीच्या पाठीवर बसून जंगलात फेरफटका मारला जातो. मात्र, लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणे शक्य होणार आहे. भारतातील पहिल्याच ‘बोट जंगल सफारी’ला पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरुवात होणार आहे.