Nagpur News : देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क नागपुरात; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते होणार लोकार्पण
Nagpur Event : भारताच्या पहिल्या संविधान प्रस्तावना पार्कचे उद्घाटन नागपूर येथे २८ जून रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या पार्कमध्ये संविधानातील मूल्यांचे भित्तिचित्र, न्यायालय-संसद भवनांच्या प्रतिकृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे.
नागपूर : देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आले आहे.