
नागपूर : नागपूर-मुंबई मार्गावर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन इंडिगो एअरलाइन्सने आणखी एक नवीन विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवीन विमान सुरू झाल्यानंतर मुंबईसाठी ७ विमान उपलब्ध होतील. ही सेवा तीन सप्टेंबरपासून सुरू होणार असून, उड्डाण २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.