कोरोनामुळे सारेच थांबले! इनडोअर स्टेडियमही बंद, खेळाडू सरावापासून वंचित

Indoor stedium are also close due to corona
Indoor stedium are also close due to corona
Updated on

नागपूर : गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मानकापूर येथील इनडोअर स्टेडियम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेकडो खेळाडू सरावापासून वंचित आहेत.परिणामतः संकुल समितीला लाखो रुपयांचा फटका बसत असून, स्टेडियमच्या देखभालीतही अडचणी येत आहेत.       

शालेय व महाविद्यालयीन परीक्षा संपल्या की मुले व पालकांना उन्हाळी शिबिरांचे वेध लागतात. इनडोअर गेम्ससाठी  मुलांची पहिली पसंती अर्थातच मानकापूरचे स्टेडियम असते.    येथे सकाळपासून रात्री आठ पर्यंत बॅचेसमध्ये शेकडो खेळाडू बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, टेबल टेनिस, जिम्नॅटिक्स इत्यादी खेळांचा सराव करतात. या माध्यमातून समितीला दोन लाखांचे उत्पन्न होते. याशिवाय स्टेडियममध्ये इतरही कार्यक्रम चालतात. यातूनही दोन ते तीन लाखांची कमाई होते. लॉकडाउनमुळे या उत्पन्नापासून समितीला वंचित राहावे लागले. सध्याची स्थिती लक्षात घेता लॉकडाउन वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात नुकसान आणखी अपेक्षित आहे. स्टेडियमची देखभाल करताना आधीच संकुल समितीची अडचण होत आहे. त्यात आता कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे समितीची अवस्था सध्या 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास' अशी झाली आहे.                          

यासंदर्भात क्रीडा उपसंचालक डॉ. सुभाष रेवतकर यांना विचारले असता ते म्हणाले, कोरोनामुळे गेल्या एक-दीड महिन्यापासून स्टेडियम लॉकडाउन आहे. सरावासाठी खेळाडू येत नसल्यामुळे साहजिकच आर्थिक नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम 'मेन्टेनन्स'वर होतो आहे. स्टेडियमच्या 'मेन्टेनन्स'साठी महिन्याकाठी दोन लाखांवर खर्च येतो. सराव व इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून हा खर्च होत होता. मात्र सध्या आवक पूर्णपणे बंद असल्यामुळे स्टेडियमचे 'मेन्टेनन्स' करायचे कसे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com