
Importance Of Dance In Maintaining Youth And Inner Strength: सर्व कला एकत्रित होतात तो कलाप्रकार नृत्य आहे. भारतीय नृत्य कलेला प्रगल्भ वारसा लाभला आहे. आजच्या युगात भारतीय कला आणि नृत्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध भरतनाट्यम कलावंत ऋषिकेश पोहणकर यांनी केले.
प्रत्येक हावभावामध्ये भावना, प्रत्येक पावलामध्ये कथन आणि प्रत्येक तालात जीवनाची लय दडलेली आहे. नृत्य केवळ कला नसून, ती भावना व्यक्त करण्याची, संस्कृती जपण्याची आणि मानवतेला जोडण्याची एक जीवीत भाषा आहे.
दरवर्षी २९ एप्रिल रोजी जगभर ''आंतरराष्ट्रीय नृत्य दिन'' साजरा केला जातो. यापार्श्वभूमीवर ऋषिकेश पोहणकर यांच्याशी संवाद साधला. ते गत दोन दशकांपासून भारतीय शास्त्रीय नृत्य साधनेत रत आहेत. त्यांनी भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये नृत्यकला सादर केली आहे. विविध मान्यवर गुरूंकडून प्रशिक्षण घेतले. यांना अनेक राष्ट्रीय मानसन्मान आणि पुरस्कार लाभले आहेत. नृत्यकलेचा प्रसार आणि नवोदित कलाकार घडवण्याच्या हेतूने एक नर्तक, शिक्षक आणि संशोधक म्हणून ते भारतीय कला परंपरेचा उज्ज्वल वारसा पुढे नेत आहेत.
नृत्य माणसाला देवत्वाकडे घेऊन जाणारे माध्यम आणि परमेश्वर प्राप्तीचा सर्वात मोठा मार्ग आहे. नृत्यात गायन, वादन आणि चित्रकलेसह अन्य कलांचा समावेश आहे. चित्रकार कॅनव्हासवर चित्र काढतो. नर्तक किंवा नर्तकी रंगमंचावर येऊन त्या चित्राला जीवन देतो आणि त्या कलेला साकारते. भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन, वादन आणि चित्रकलेचा संगम असलेली अमूल्य कला आहे. आपण ती जोपासली नाही, तर दुसऱ्या देशात जाऊ शकते आणि आपल्यालाच ती त्यांच्याकडून शिकावी लागेल, अशी चिंता पोहणकर यांनी व्यक्त केली.
भारतीय कला, संस्कृती आणि नृत्य आपली ओळख आहे. ती आत्मसात करूनच आपण आपली संस्कृती जपू शकतो. सध्या युवा पिढीचे पॉप कल्चर आणि वेस्टर्न डान्सकडे आकर्षण वाढू लागला आहे. परंतु, हे तात्पुरते आहे आणि भारतीय शास्त्रीय नृत्य प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी चिरतरुण आणि दिव्य दिसते. नृत्य एक कला शारीरिक आणि आत्मिक उन्नती साधते. कला जोपासा, रूजवा, फुलवा आणि कलेसोबत आपले आयुष्य अतिशय कलात्मक करा, कारण नृत्यकला ही माणसाला चिरतरुण ठेवते आणि हेच माणसाला जिवंत ठेवते, असे पोहणकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.