Italy Road Accident
esakal
इटलीतील भीषण अपघातात नागपूर दाम्पत्य ठार
मोठी मुलगी गंभीर, इतर कुटुंबीय जखमी
भारतीय दूतावासाने शोकसंदेश जारी केला
नागपूर : इटलीत पर्यटनासाठी गेलेल्या नागपूरच्या दाम्पत्याचा रस्ते अपघातात (Italy Road Accident) मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात दाम्पत्याची मुलगी गंभीर जखमी असून, धाकटी मुलगी व मुलगाही जखमी झाले आहेत. ग्रोसेटो जवळील स्टेट हायवे वन ऑरेलिया (State Highway One Aurelia) वर गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.