esakal | Nagpur । जाधव समिती करणार तपास महानिर्मितीमधील कोळसा घोटाळा
sakal

बोलून बातमी शोधा

कोळसा

जाधव समिती करणार तपास महानिर्मितीमधील कोळसा घोटाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोळसा खाणीतून चांगल्या दर्जाच्या कोळशाची उचल करून महानिर्मितीला निकृष्ट कोळसा पुवरवठा केला जात असल्याच गैरप्रकार नुकताच उघडकी आला होता. याप्रकरणाच्या चौकशीसाठी महानिर्मितीने चौकशी समिती स्थापन केली आहे. या घोटाळ्यात कंत्राटदारांसह काही अधिकारी गुंतले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

चौकशी समितीच्या माध्यमातून घटनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी संचालक (खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. चौकशीद्वारे सर्व संबंधित जबाबदार घटक शोधण्यात येतील, तसेच असे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा परामर्श केला जाणार आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ही समिती या प्रकरणी सविस्तर अहवाल तातडीने सादर करणार आहे.

हेही वाचा: माझा गर्व, माझी मुलं!

महानिर्मितीने कोळशाच्या वाहतुकीचे कंत्राट दिले आहे. खाणीतून कोळशाची उचल करून तो महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्राला पुरवठा केला जातो. याकरिता प्रत्येक वाहनांच्या नंबरची नोंद आधीच केली जाते. प्रत्येक वाहनांवर जीपीएस ट्रॅकरही लावले आहे. असे असताना चार दिवसांपूर्वी कोळसा खाणीतून कोळशाच्या उचल करून एक ट्रक निघाला होता. त्याऐवजी दुसराच ट्रक महानिर्मितीत दाखल झाला होता.

वाहनाच्या नंबर प्लेटवर स्टिकर लावण्यात आले होते. हा प्रकार समजताच चांगलीच खळबळ उडाली होती. महानिर्मितीच्यावतीने या विरोधात पोलिस ठाण्याच तक्रारसुद्धा दाखल केली आहे. ट्रक चालक तसेच कंत्राटाशी संबंधित काही जणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. एक ट्रक बदलल्याचा प्रकार उघडकीस आला असला तरी हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय ट्रक आत येऊच शकत नाही अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top