esakal | struggle : अधू हाताने अन्सारी शोधतोय आयुष्याचे ‘ॲन्सर’; दिव्यांगत्वावर मात करीत चालवीत आहेत गॅरेज

बोलून बातमी शोधा

Jahangir Ansari is running a garage overcoming paralysis

अन्सारी यांनी सोमलवाडा, बेलतरोडी रोड, मनीषनगर येथील वर्दळीच्या रस्त्यावर गाडी दुरुस्तीचे दुकान टाकून व्यवसाय सुरू केला. एका हाताने अधू असल्याने दुकानात आलेल्यांना ते कामाचे दिव्य कसे पार पाडतील, असा प्रश्‍न पडायचा आणि आजही पडतो.

struggle : अधू हाताने अन्सारी शोधतोय आयुष्याचे ‘ॲन्सर’; दिव्यांगत्वावर मात करीत चालवीत आहेत गॅरेज
sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोलकात्याच्या मुस्लिम कुटुंबात १९७५ मध्ये गोंडस बाळाने जन्म घेतला. बाळ जन्मजात धष्टपुष्ट होत. पाहता पाहता बाळ पाच वर्षांचे झाले. पाचव्या वर्षी मुलाच्या एका हाताला पोलिओ झाला. आई-वडिलांनी बाळ बरे व्हावे म्हणून १४ वर्षे उपचाराचे प्रयत्न करून पाहिले. परंतु, पोलिओने प्रभावित झालेला हात सामान्य झाला नाही. अशा स्थितीत वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करून अन्सारी यांनी आयुष्याचे ‘ॲन्सर’ शोधण्याचा प्रयत्न केला. मानवी आयुष्य हे एकदाच मिळालेली जहागिरी मानणाऱ्या त्या तरुणाचे नाव जहागीर कादीर अन्सारी (४३, रा. मनीषनगर) आहे.

अन्सारी मूळचे बंगाली. बंगाल म्हटलं की वाघ आलेच. वाघांपासून लढाऊ बाणा अंगी मिळालेले जहागीर अन्सारी तसे अशिक्षितच. मदरशात शिक्षक घेत असताना तीनदा नापास झाल्याने शिक्षण सोडले; परंतु संघर्ष करण्याची जिद्द सोडली नाही. अशिक्षित असल्याने कोलकात्यातील वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. अशातच १९९७ मध्ये त्यांनी सहकुटुंब नागपूर गाठले.

जाणून घ्या - संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर

संसाराचा गाडा हाकण्यासाठी वडिलांनी वाडीजवळील वडधामना येथे गॅरेज थाटले. परंतु, त्यांचे वडिलांसोबत काम करताना मन रमले नाही. जहागीर यांनी मित्राच्या मदतीने २००३ मध्ये चिंचभवन येथील एबीएम कंपनीत नोकरी सुरू केली. मुळातच अंगी लढाऊ बाणा आणि परिस्थितीशी दोन हात करण्याचे बाळकडू मिळालेल्या जहागीर यांनी २०१२ मध्ये नोकरी सोडली. यानंतर त्यांनी लातूर व नंतर जयपूर येथे फुटपाथवर गॅरेजचे दुकान टाकले. पण तिथेही मन रमले नाही. न राहवून त्यांनी परत नागपूर गाठले.

अन्सारी यांनी सोमलवाडा, बेलतरोडी रोड, मनीषनगर येथील वर्दळीच्या रस्त्यावर गाडी दुरुस्तीचे दुकान टाकून व्यवसाय सुरू केला. एका हाताने अधू असल्याने दुकानात आलेल्यांना ते कामाचे दिव्य कसे पार पाडतील, असा प्रश्‍न पडायचा आणि आजही पडतो.

मात्र, दिव्यांगत्वावर मात करीत ते दुकान चालवीत आहेत. त्यांना या कामी मुलांचीही साथ मिळतेय. चांगल्या ठिकाणी जागा मिळावयाची झाली तर लाख, दीड लाखाचे भांडवल गुंतवावे लागते. दुकान किरायाने घेण्याची परिस्थिती नसल्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर हे काम करीत आहोत, असे ते सांगतात.

मोठे वाहन दुरुस्ती करणे सोपे

सायकल व दुचाकी वाहने दुरुस्त करताना त्रास होतो. कारण, वाहन सतत हलत असते. याउलट चारचाकी व मोठे वाहन दुरुस्त करणे अधिक सोपे असते. पाना लावून नट खोलायचे. नट काढताच एका हाताने चाक खाली पाडायचे. चाक ढकलत नेत दुरुस्त करून लावणे सोपे असल्याचे जहागीर अन्सारी म्हणाले.

जाणून घ्या - अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या अध्यक्षांनी केला मोठा खुलासा

आश्‍चर्यचकित होऊन स्तुती
एका हाताने अधू असल्यामुळे वाहन दुरुस्तीसाठी येणारे वाहनधारक सुरुवातीला ‘आप काम कैसे करोगे’ असा प्रश्‍न करतात. मात्र, काम होताच आश्‍चर्यचकित होऊन स्तुती करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.
- जहागीर अन्सारी,
फुटपाथ, गॅरेज दुकानदार