esakal | अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या अध्यक्षांनी केला मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

company president satyanarayan nuval give explanation about gelatin sticks found in front of mukesh ambani house

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली असून त्यामुळे मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ही गाडी चोरीची असून त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत.

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या अध्यक्षांनी केला मोठा खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : मुंबईमध्ये मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. त्यामध्ये असलेल्या जिलेटीनच्या कांड्यावर नागपुरातील कंपनीचे नाव आहे. त्याबाबत कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी मोठा खुलासा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

हेही वाचा - २०० वर्षांत पहिल्यांदाच सक्करदरा तलाव फेब्रुवारीतच...

आम्ही परवानगीनुसारच विक्री करत असतो. बॉक्समध्ये त्याचा डेटा उपलब्ध असतो. तो आम्ही पोलिसांना उपलब्ध करून देऊ. मात्र, ही स्फोटके खुल्या स्वरुपात सापडत असतील तर त्याचा मागोवा घेणे कठीण आहे, असा खुलासा सत्यनारायण नुवाल यांनी केला आहे.  

हेही वाचा -  'इको'च्या प्रतीक्षेत संपले ऑक्सिजन, धावाधाव...

दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली असून त्यामुळे मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ही गाडी चोरीची असून त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. तसेच त्यामध्ये धमकीचे पत्र आढळले असून काही बनावट नंबर प्लेट देखील आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.