Jam Project Water: पिके हातची गेल्यावरच ‘जाम’चे पाणी मिळणार का? रब्बी हंगाम संकटात; कपाशी, तूर आणि फळबागांना सिंचनाची प्रतीक्षा

Jam Project Irrigation Water : नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिके आणि संत्रा-मोसंबीच्या फळबागांसाठी जाम प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. प्रकल्प ७० टक्के भरला असून, सिंचनासाठी डिसेंबरमध्ये एक आवर्तन देण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Farmers in Narkhed taluka demand irrigation water from the Jam Project to protect rabi crops and citrus orchards.

Farmers in Narkhed taluka demand irrigation water from the Jam Project to protect rabi crops and citrus orchards.

esakal

Updated on: 

जलालखेडा : शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावून घेतल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल जाम प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी कपाशी, तूर तसेच संत्रा-मोसंबीच्या फळबागांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, गरजेच्या वेळी जाम प्रकल्पाचे पाणी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

Loading content, please wait...