"वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है..." पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना जयंत पाटलांचा टोला  

Jayant patil criticized leaders who left NCP in Nagpur
Jayant patil criticized leaders who left NCP in Nagpur

नागपूर ः राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या पाचव्या दिवसाची सुरुवात नागपूर जिल्ह्यातून झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पक्ष संघटनेचा आढावा घेणारी बैठक घेतली. आगामी काळात नागपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मागच्या वेळेस पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र या गोष्टी आता मागे टाका. ‘वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है’, असे सांगत पक्षाचे बुथ संघटन अधिक मजबूत करा, जोमाने कामाला लागा, राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा आणि शरद पवारांच्या विचारांचा प्रसार करा, असा कानमंत्री राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

 "नेत्यांची खरी ताकद कार्यकर्ते असतात. आपल्या नेत्यांच्या मागे कार्यकर्ते नेहमीच उभे राहतात. आज सभागृहात मोठी गर्दी होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे सक्षमपणे उभे राहतात, हे पाहून समाधान वाटले. आगामी काळात नागपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मागच्या वेळेस पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र या गोष्टी मागे टाका. 'वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है' पक्षाचे बुथ संघटन अधिक मजबूत करा, जोमाने कामाला लागा, राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा प्रसार करा."

तर गृहमंत्री ना. अनिल देशमुख म्हणाले की, "नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगलं काम करत आहोत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठत आहे. आपण विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करावे." यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिनानाथ पडोळे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ओबीसी सेलचे ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जावेद हबीब, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेसाठी स्वबळाची तयारी करा

राजकारणात ताकद महत्त्वाची असते. तरच दखल घेतली जाते. असा मंत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक वॉर्डातील बुथ बांधण्याची सूचना केली. महापालिकेच्या निवडणुकीत याला, त्याला जागा मागण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमात पाटील यांनी आज शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

प्रत्येक बूथवर ताकद निर्माण करावी

शहरात राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. हाच धागा पकडून पाटील यांनी आगामी महापालिकेची निवडणूक लढायची असेल आणि आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढवायची असेल तर प्रत्येक बूथवर ताकद निर्माण करावी लागेल असे सांगितले. अन्यथा किती जागा लढल्या, काँग्रेसला कितीही जागा वाढवून मागितल्या तरी त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागला. राष्ट्रवादीची ताकद दाखवा. राज्यात आपली सत्ता आहे. त्याचा पुरेपूर लाभ घ्या. काँग्रेस किती जागा सोडेल नाही सोडेल, हा सध्या प्रश्न नाही. ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी बघू. मात्र तत्पूर्वी आपला पक्ष ताकदवान करा. मग वाढीव जागा मागण्याची गरजच भासणार नाही. प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असेही जयंत पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवक्ता श्रीकांत शिवणकर यांनी केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com